Thursday, January 12, 2012

सर्वांना गरीब मित्रा कडून ह्याप्पी नीव इअर..

सर्वांना गरीब मित्रा कडून ह्याप्पी नीव इअर..
कोणी पितो दारु तर कोणी पितो बिअर.........................

कोणी पितो दारु तर कोणी पितो बिअर.........................
आमच्या गरीबा कडून सर्वांना
हयाप्पी नीव इअर .......

सुखा समाधानात रहा सर्वजन
नका करू मारा मारी
सर्वांच्या घरी लागुदे सुख ,
लक्ष्मी नांदो तुमच्या घरी
आनंदात निरोप दया २०११ ला ..........
करा एकदा चिअर ......
आमच्या गरीबा कडून सर्वांना ह्याप्पी नीव इअर

२०११ मधे झाली असेल चुक
माफ़ी माघतो तुमची
तुमच्या सारखे लाभले मित्र
हीच तर पूर्व पुण्याई आमची
दिलात मैत्रीचा हाथ असाच असुद्या एव्हरी इअर .....
आपल्या गरीब मित्राकडून सर्वांना हयाप्पी नीव इअर

तंदुरुस्त रहा ,खुप हसा
खुप मज्जा करा
आयुष्याचा प्रतेक क्षण सुवर्ण मय करा
रिक्वेस्ट आहे सर्वांना
नका पिऊ दारू नी नका पिउ बिअर
सर्वांना गरीब मित्रा कडून ह्याप्पी नीव इअर.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

चांगल्या मुलांना चुकीच्या मुली मिळतात



चांगल्या मुलांना चुकीच्या मुली मिळतात,

चांगल्या मुलींना चुकीची मुले मिळतात... पुढे हि जोडपी प्रेमात पडतात
आणि चांगला मुलगा आणि चांगली मुलगी फसले जातात .. .त्यामुळे होते काय, तर चांगल्या मुलांना वाटते
कि सगळ्या मुली fraud च आहेत
आणि चांगल्या मुलीना वाटते कि सगळी मुले filrty च आहेत.. अशी भावना झाल्यानंतर
जेव्हा चांगला मुलगा आणि चांगली मुलगी हे एकमेकांना भेटतात
तेव्हा ते प्रेमात पडायचे टाळतात.....

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

अगं वेडे...मी तुझ्यावर प्रेम करतो...


अगं वेडे...मी तुझ्यावर प्रेम करतो...
ती म्हणाली तू मला इतका कसा ओळखतोस,
कितीदा भेटलास मला की, माझ्या साठीच जगतोस...
आपण एकत्र घालवलेले क्षण किती थोड़े होते,
तरी का रात्रं-दिवस तुला माझीच 'याद' येते.
नीट पहिलेहि नसशील, तू मला डोळे भरून,
तरी मी छळते तुला का, रोज स्वप्नी येऊन?
हे असं होण शक्य तरी कसं आहे,
नक्की माहित नाही, पण माझीही गत तीच आहे.
अगं वेडे... मी म्हणालो, अगं वेडे मी म्हणालो,
क्षण एकच पुरे होता, जो तुझ्या मुळे मी जगलो.
अन् कुणी सांगितलं क्षण ते दोघांचे थोड़े होते,
तुझ्या आठवणीने दिवस उगवतो, आठवणीनेच रात्र होते.
येता जाता उठता बसता क्षण न क्षण मी तुझाच असतो,
तुझ्या सवे गं सखये मी, नित्य नवा असा जगतो.
तुला दु:ख होतं तिथे अन्, आसवे मी गाळतो,
तुला लगते ठेच तिथे अन् पाय माझा रक्ताळतो.
तुला वाटेल का बरे हा नित्य माझ्यासाठी झुरतो,
मी म्हणेन अगं वेडे, मी तुझ्यावर प्रेम करतो..

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

काही हक्क आपले नसतात

काही हक्क आपले नसतात,
मागू नयेत.

काही वाटा आपल्या नसतात,
त्यांना सरावू नये.

काही स्वप्नं आपली नसतात,
पाहू नयेत.

काही कोपरे आपले नसतात,
डोकवू नये.

काही उखाणे आपले नसतात,
सोडवू नयेत.

काही शब्द आपल्यावर फ़ेकले,
तर झेलावेत.

काही कळा आपल्याच असतात,
त्या सोसाव्यात.

काही अश्रू आपलेच असतात,
मोत्यात बदलावेत

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

कधीतरी कळेल तुला

कधीतरी कळेल तुला
आपल्या प्रेमाची किंमत
पाणावलेल्या डोळ्यांनी
आठवशील ते क्षण
एकाच शाळेतील आपली भेट
कॉलेज वेगळ पण घराची वाट एक
तासंतास थाबय्चास त्या वाटेवरती
फक्त आपण एकत्र घरी जाव यासाठी
खूप प्रयत्न करून एकदा तू विचारलास
आणि तुझ्या त्या निरागस्तेकडे बघून
मी पण हो म्हणाले
काही दिवस सुंदर गेले .
एकत्र येण जाण
पूर्ण दिवस एकत्र राहूनही
अजून थोडावेळ तू जवळ असावस
असा वाटण
पण तेव्हा कधी वाटल नव्हत अस होईल
तुझी माझी वाट वेगळी होईल
क्षणात सगळ संपेल
इतक्या दिवसाची आपली साथ अशी तुटेल
जे झाल ते विसरण माझ्यासाठी खूप खूप कठीण आहे
माझ प्रेम कळाल नाही हि मात्र एक खंत आहे
आता फक्त एकच विश्वास आहे
या जगात मी जोपर्यंत आहे
तोपर्यंत किमान एकदा तरी कळावी
तुला आपल्या प्रेमाची किंमत.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

अस्तित्व

प्रत्येक जण स्वताच अस्तित्व शोधत असतो
फुल त्याच्या सुगंधात
पान त्याच्या रंगात
तर फुलपाखरू त्याच्या जीवनात
पक्षी त्याच्या पिलांमध्ये
नदी प्रवाहामध्ये
दिवा त्याच्या तेजामध्ये
तर बरसणारा पाऊस त्याच्या थेंबामध्ये
सूर्य त्याच्या प्रकाशामध्ये
चंद्र त्याच्या शीतलते मध्ये
तर चांदण्या काळ्याकुट आकाशामध्ये
मग आपलच का अस झालाय
अस्तित्व हरवल्या सारख
स्वताच अस्तित्व हरवून मी
का जगतेय तुझ्या अस्तित्वामध्ये

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

चुका


क्षणोक्षणी चुका घडतात,
आणि श्रेय हरवून बसतात.
आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला
फार काही शिकवत असतात.
कणभर चुकीलाही
आभाळाएवढी सजा असते,
चुक आणि शिक्षा यांची कधी
ताळेबंदी मांडायची नसते
एक कृती, एक शब्द
एकच निमिष हुकतं-हुकतं
उभ्या जन्माच्या चुकामुकीला
तेवढं एक निमित्त पुरतं
अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी
आपण मात्र शिकत असतो
पुन्हा पुन्हा चुकण्यासाठी!. .. ..

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

मी एक छत्री , मी एक छत्री


मी एक छत्री , मी एक छत्री
मी एक छत्री
अल्पशी आपली मैत्री
चार महिने तुझ्या मुठित
नंतर पलंगाच्या पेटीत
नेहमीच मी मुठीत
एकदा तरी घेतलसं का रे मिठीत
नशिबी नाही माझ्या, तुझी गोड मैत्री
नाते हे मैत्रीचे, मैत्री ही कोरडी
झेलते मी जलधारा, या काळजावरी
आज काळीज फाटंल, जोराच्या सरीपरी
कोरडी ती मैत्री, आज झाली ओलीचिंब
तुटले हे नाते, कारण झाले मी अपंग
तुला काय मिळेल, मैत्री नवीन शंभरात
टाकशील मला माळ्यावर, नाहीतर पडेन कचर~यात
पडली जर माळ्यावर , तर कुरडतील उंदीर
नको होऊ देऊ, हा देह छिन्न छिन्न
त्या पेक्षा मला टाकरे जाळून
मी एक छत्री , मी एक छत्री

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Wednesday, January 11, 2012

माघार

कळतंय मला तुझे वागणे
अस अचानक सारेच तोडणे
मान फिरवून जाताना हळूच
येणाऱ्या अश्रूला पुसून टाकणे

पण किती वेडा तू
समजलास नाही कधी
येते का माघारी
परतून वाहणारी नदी

तिचे नाते सागराशी
ते ना कधी संपायचे
त्याच्यातच अस्तित्व तिचे
त्यातच हरवून जायचे

तुला ना जमले कधी
विसरणे मीपण स्वताचे
येताच क्षण संघर्षाचे
ठाऊक माघारी फिरायचे

काही नाती असतात अशी
सोबतीस जशी श्वासांची दोरी
सरते नाते ना संपते परी
कधी आठवणींची शिदोरी

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

भिती ...


ट्रिंग ट्रींग फ़ोनने आपण जिवंत असल्याची घोषणा केली आणि वैतागत हातातले मासिक टाकत निशांतने फ़ोनला हात घातला.
" कोण"? त्याच्या आवाजातला वैताग जाणवत होता.
" मी स्वप्ना बोलतेय". पलिकडून उत्तर आले.
" कोण स्वप्ना"
" अरे स्वप्ना, स्वप्नाली तुझी मैत्रिण"!
" अरे स्वप्ना तु? इतक्या दिवसांनी नाही वर्षांनी फ़ोन करतेयस? कुठे होतीस इतके दिवस विसरलीस की काय मला?"
अरे हो! हो! किती प्रश्न एकदम विचारतोस, तुला माहिताय ना माझ्या पपांच्या बदलीनंतर आम्ही सगळेजण बंगलोरला गेलो".
" ते माहीताय गं मला पण त्या नंतर तु माझ्याशी संपर्कच ठेवला नाहीस ईतक्या दिवसांची दोस्ती एकदम कचरापेटीत टाकलीस"
"चिडतो काय रे? तु आजिबात बदललेला नाहीस इतक्या इतक्या गोष्टीवरुन आजुनही चिडतोस वाटतं!"
"ही इतकीशी गोष्ट? अगं आपले एकमेकांशिवाय पान नव्हते हलत, एकत्र लेक्चर बंक केली, एकत्र कॅंटीनची बिलं वाढवली तुला आठवतं तो भट आपल्याला मेगा कस्टमर म्हणायचा?"
"सगळं आठवत रे! फ़क्त आठवणीच उरल्यात आता".
" का गं स्वप्ना काय झालं तुझा आवाज असा उदास का?"
" नाही रे उगीच आपलं"
" हे बघ स्वप्ना तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखतो काहीतरी बिनसलय नक्की पपा काही बोलले का आत्ता फ़ोन केल्यावरुन"
"नाही रे ! "
" मग नक्कीच ममा रागाने बघत असेल तुझ्याकडे तिला मी आवडत नव्हतोच, तुझा मित्र व्हायची लायकी नव्हती माझी असं नेहमीच म्हणायची ना ती?"
" अरे कुणी काही म्हणत नाहीये! तुझा राग करणारी ममा आणि सारखे शहर बदलणारे पपा आता या जगात नाहीयेत दोन वर्षांपुर्वीच कारच्या अपघातात गेले दोघेही"
" ओऽह सॉरी पण तु अशी रडतेस कशाला? आणि आत्ता आहेस कुठे?"
" मी रडत नाहीये आठवण आली रे फ़क्त त्यांची, मी आता तुझ्याच शहरात आलेय रहायला घरुनच बोलतेय"
" आणि तुला माझा न.बर मिळाला तरी कसा?"
" ती एक गंम्मतच आहे तो आपला पोटू आठवतो का? तो माझ्या ऑफ़िसच्या जवळ भेटला काल त्याच्याशी गप्पा मारताना मला तुझा नंबर मिळाला"
" हं आत्ता कशी हसलीस आता या बद्दल त्या पोटूला पार्टी द्यायला पाहीजे. आणि रहातेस कुठे आता?"
" रहायला कंपनीने फ़्लट दिलाय की, एकदम वेलफ़र्निशड आहे !"
" मग आता कोण कोण रहाता तिथे?"
"कळला कळला मला तुझा तिरकस प्रश्न, मी आजुन लग्न केलेलं नाहीये एकटीच रहाते! तु ही लग्न केलं नाहीयेस असं ऐकलं!"
" होऽऽ तुझी वाट बघत होतो, तु आली नाहीस!"
" मग आता आले ना बोल कधी करतोयस लग्न? आणि तुला प्रेझेंट काय आणु"?
" खेचा, खेचा आमची तंगडी च्यायला तु मला म्हणतेस पण आजुन तु ही आहेस तशीच आहेस की!"
" गंम्मत केली रे तुझी, पण खरं सांगु ते फ़ुलपाखरी दिवस आता राहीले नाहीत कॉलेज संपले आणि ते ही संपलेच, त्यावेळcया आठवणी..........................................."
" का गं का गप्प झालीस पुन्हा रडायला लागलीस की काय?"
"नाही रे लाईट गेले इथले आणि मला आता भिती वाटायला लागलेय."
" हॅच्च च्या मारी आजुनही भित्री भागुबाईच का लाईट गेल्यावर घाबरुन लपणारी?"
" आता वाटते भिती त्याला औषध आहे का?"
" आहे की अधुन मधुन हॉरर पिक्चर पहात जा ड्रॅक्युला, द ममी सारखे"
" निशु प्लिज हं आधी मला इथे भिती वाटतेय आणि त्यात तु मला आणखी घाबरवु नको हं"
" आता घाबरायच काय त्यात? म्हणजे बघ हं अंधार झाला ना की भुतं बाहेर पडतात इतकच"
" निशु गप्प बसशील का?"
" बघ म्हणजे मी गप्प बसेन पण मग एखादं भुत गप्प बसेल का? तुला एकटी बघुन?"
" निशुऽऽ आता जर विषय बदलला नाहीस तर मी फ़ोन कट करेन"
" बिंधास्त कट कर फ़ोन तु आता मी फ़ोनवर बोलतोय म्हणुन तरी निदान तु एकटी नाहीयेस पण फ़ोन कट केलास की तु एकटीच त्या काळोखात"
" निशु, माझ्या अंगाला घाम सुटतोय तु आता आणखी घाबरवु नकोस!"
" तु घाबरतेस कशाला? आणि घामच तर सुटलाय ना बघ हळूच एखादा हात येईल टॉवेल घेउन पुढे"
" निशु माझ्या छातीची धडधड वाढलेय "
" अगं भुतांमधे एखादे डॉक्टर भुत असेलच की ते तपासेल तुला" " आता विचार कर रात्र तर आहेच लाईट गेलेले, रस्ते सुनसान, त्यातुन ईथला बराचसा भाग नुसता ओसाड पडलेला, कुठे ना कुठे तरी एखादे स्मशान असेलच त्यात दिवसभर आराम करत पडलेली सगळी भुतावळ आज आमावास्येच्या आधी आलेल्या या अकस्मीक सुटीमुळे खुष झालेली असतील, ते सगळे आता एव्हाना सगळ्या काळोख्या भागात शिरलेही असतील, त्यांना सगळीच घरं काही काळोखात असलेली सापडली नसणार त्यात पुन्हा काही घरांच्या दारात देवाच्या मुर्ती आहेत म्हणजे तिथेही प्रवेश नाही मग राहीली एकटी आणि असंरक्षीत घरं त्यातल्या त्यात फ़्लॅट कारण बिल्डींग बांधताना बिल्डर काही जागेचा विचार करत नाही. मग सगळे मिळुन एखाद्या भित्र्या माणसाच्या शोधात असतील, आणि बाहेर बघ कदाच
त्यात फ़्लॅट कारण बिल्डींग बांधताना बिल्डर काही जागेचा विचार करत नाही. मग सगळे मिळुन एखाद्या भित्र्या माणसाच्या शोधात असतील, आणि बाहेर बघ कदाचीत एखाद्यावेळेस तुझ्या घरात यायच्या तयारीत असतील सगळे बाहेर कुणाचे डोळे वगैरे तर चमकत नाहीयेत ना?"
"स्वप्ना!, स्वप्ना? अग आहेस की नाही तिकडे की घाबरुन फ़ोन टाकलास ?"
" ए स्वप्ना अगं किती घाबरतेस? एखादं भुत येइल तेंव्हा काय म्हणेल?"
" मी ऐकतेय तु बोलत रहा निशु"
" अरे स्वप्ना तुझी भिती गेली वाटतं आवाज एकदम बिंधास्त वाटतोय"
" आता मी आहेच बिंधास्त"
" बघितलसं एखाद्या माणसाची भिती घालवायला भिती घालणे हाच एक मस्त मार्ग आहे की नाही आता गेली की नाही तुझी भिती?"
"गेली की, आगदी कायमची! "
" पण आता तुला आणखी काय झालंय आवाज एकदम फ़्लट येतोय तो"
" काहीच नाही!"
" अरेच्च्या आज काहीतरी जोरदार भानगड झालेली दिसतेय इकडचे पण लाईट गेले"
"आता तुझी पाळी"
"घाबरायची? छट आपण आजिबात भित्रा नाहीये तुझ्या सारखा, पण तु काही दिवा, मेणबत्ती लावलेयस की नाही नाही तर खरंच एखाद भुत यायच हो"
" त्याची आता काही गरज नाहीये!"
"आच्छा म्हणजे तिकडचे लाईट आलेले दिसतायत तरीच म्हंटल बाईसाहेब ईतक्या बिंधास्त कशा बोलतायत"" एक मिनीट माझा शेजारी आलाय त्याच्याशी जरा बोलतोय फ़ोन कट करु नको"
" काय साने इतक्या काळोखात? काय काम काढलेत"
"आधी मला सांगा निशांत तुम्ही फ़ोनवर कुणाशी बोलताय ?"
" माझ्या जुन्या मैत्रीणीशी हेच विचारायला आलात का "
" नाही हो शॉर्टसर्कीटमुळे पंधरा मिनीटांपुर्वी एक्चेंज बंद पडलेय म्हणुन आपल्या सगळ्या एरियातले फ़ोन चलु नाहीयेत तुमच्या मोबाईलचे नेटवर्क चालु आहे का ते विचारायला आलो होतो" " निशांत! निशांत असे काय करताय काही होतेय का तुम्हाला? अहो असे छाती का आवळताय बाप रे अटॅक येतोय की काय? डॉकटरना बोलावु का? आहो निशांतऽऽऽऽऽ....................................

"का गं स्वप्ना म्हणजे तु माझ्याशी बोलतानाच?........ "
" हो तु म्हणालास ना की मागे पहा म्हणुन तेंव्ह मागे पाहीले तर खिडकीत खरंच डोळे चमकताना दिसले आणि मग सगळे शांत शांत!! मग कळाले की मागच्या पारीजातावरचे काजवे चमकत होते ते"
" पण मग पुढचं कसं काय?"
" साधी गोष्ट आहे तुलाही माझ्या भितीची जाणीव करुन द्यायची होती त्याच भावनेचा माझ्या अखेरच्या क्षणावर पगडा होता त्यामुळे बोलत राहीले अन काय पण तु ईतका भित्रा निघशील असं नव्हत वाटलं"
" हो बंद फ़ोनवर इतकावेळ तुझ्याशी गप्पा मारल्यावर दुसरे काय होणार?"
आणि ते दोघे उठून चालायला लागले नदिकाठच्या स्मशानाकडे.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Saturday, October 8, 2011

आळशी माणसं खुप हुशार असतात


" : आळशी माणसं खुप हुशार असतात :". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.


आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं. ;D


ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे. ;D


हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर. :D :D :D


ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला

मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D


पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही? :-[

मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D


पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही? :-[


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


बाप ....

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन् शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन् सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

कधी एकट जगून तर बघ

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

बी हंग्री, बी फूलिश!


बी हंग्री, बी फूलिश!

स्टीव जॉब्स
मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं ...भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.


त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.

दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.

मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अॅयपल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अॅरपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अॅझपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले. माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अॅधपल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती. यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.


पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अॅचपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अॅलपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.

चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.



माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. - मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा... त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.

वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.


नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश...’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Tuesday, April 26, 2011

एक सर्व्हे- आय.टी. कामगारांचा !


* १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.

* २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला)

* ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही.

* ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???)

* ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते.

* ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.

* ७०% आय.टी. कामगार (जगभरातील) रोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात.

* ८०% आय.टी. कामगार आपल्या पालकांजवळ राहत नाहीत.(खरं आहे)

* ९०% आय.टी. कामगार हे स्वत:चे जीवन,बायको,प्रोजेक्ट डेडलाईन,पगारवाढ,भत्ते,ऑनसाईट भेटी,कंपनी च्या ग्राहकांची खुशमस्करी, बढती,विसा स्टेटस,कमीटमेंट याबद्दल कधीच समाधानी नसतात.

* १००% आय.टी. कामगारांना आयुष्यात एकदा तरी असतं वाटतं कि आय.टी.सोडून इतर क्षेत्रात काम केलं असतं तर बरं झालं असतं.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Wednesday, April 20, 2011

केलेस लग्न का तू ? एक व्हिजन

आयुष्य आज माझे मोडीत काढले मी !
स्वर्गातुनी सुखाच्या पाऊल काढले मी !!

ती बोलते अशी की, मी कोण घोर पापी !
भाळूनिया दिवाळे माझेच काढले मी !!

तो हो तिचा नगीना, माझ्या गळ्यास फाशी !
फासातुनी कितीदा मानेस काढले मी!!

वैतागलो जिवाला, पण कीव येत नाही !
श्वासात वेदनेचे हुंकार काढले मी !!

"जाशी बळेचि तूही का बावळ्या हलाली !"
त्यांनी दिले इशारे, वेड्यात काढले मी !!

"केलेस लग्न का तू? नाही? नको करू रे!"
ती घोडचूक एक" - अनुमान काढले मी !!

हा 'जीत' चीत झाला झेलून रोज हल्ले !
माझ्यातल्या विजेत्यां बाहेर काढले मी !!

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Saturday, April 16, 2011

एका सरड्याने इतके रंग बदलले

एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

प्रेम म्हणजे काय असतं

मनाची गोष्ट का
भावनांचा खेळ..

एक-मेकांना समजणे
का शब्दांचे ते खेळ..

तुझे-माझे करणे
का तुझ्यात मी असणे..

एक-मेकां वर रुसणे
का एक-मेकांना मनवणे..

एक-मेकांशी भांडणे
का वेळेस प्रेमाने सॉरी म्हणणे..

रात्री फोन वर तासन-तास गप्पा मारणे
का बोलता बोलता मधेच झोपणे..

दोघांनी एकाच नजरेने पाहणे
का एक-मेकांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे..

एक-मेकांच्या आवडी-निवडी लक्षात घेणे
का तिला जसे आवडेल तसेच राहणे..

प्रेमात एक आलिंगन देणे
का दुखात त्याच खांद्यावर डोके ठेवून रडणे..

रात्र-दिवस तिचा विचार करणे
का तिच्या शिवाय काही उमजणे..

प्रेमात उंच असे मनोरे बांधणे
का ती सोडून गेल्यावर तेच मनोरे तुटणे..

तिच्यासाठी काहीही करायला तयार होणे
का ती सोडून गेल्यावर जीवही द्यायला तयार राहणे...

हेच कोडं मनात असते...
नाही सुटत अजूनही ते कि नक्की

........प्रेम म्हणजे काय असतं........

Thursday, April 14, 2011

मूर्तिकार ...

मी तिला असं दुःखवायला नको होतं……

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं…
हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?

आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं… तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का…?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक …पण,
मी काय करू? काय नको ? …असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
मी काहीच बोललो नाही.

बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं…

मी तिला असं दुःखवायला नको होतं……

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी