Tuesday, January 11, 2011

प्रश्न


कुठेच उत्तर मिळत नाही म्हणून
एक प्रश्नाने आत्महत्या केली
सर्व प्रश्न एकत्र आले आणि
एकान मडके आणले
एकानं सरणाची तयारी केली
सरणाला अग्नी देऊन.............
निश्वास टाकत एक प्रश्न म्हणला..
"चला एक तरी प्रश्न मीटला ! "



शब्दांना गुंतवु कसा मी ....

तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
रात्रीच्या आठवणी नंतर
सकाळच्या सोनेरी उन्हामध्ये
उमलते एखादे फुल.

टपोर्‍या डोळ्यावरील पुसत दव बिंदू
हास्य रंगाचे चेहर्‍यावर घेऊन
सुगंधाची करत बरसात
उमलते एखादे फुल.

नाजुक पाकळी ओठांची
किंचित विलग
आश्वासक शब्दांचा दिलासा देत
तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी

विनोद .... वेळ

कामवाली गंगू रागारागात मालकिणीला म्हणाली,
मॅडम तुमची हि साडी परत ह्या,
मॅडम : अरे पण का?
गंगू : मग काय, हि साडी नेसली कि साहेबाना वाटत तुम्हीच आहात, ते लक्ष पण
देत नाहीत आणि माळ्याला पण वाटत तुम्हीच आहात, तर तो येता जाता चावटपणा
करतो...

एकदा एका कावळ्याने संताच्या डोक्यावर शी केली.
संता (चिडून ओरडतो) : तू चड्डी नाही घालत का रे ?
कावळा : तू चड्डीतच करतो का रे ??

कांदयाने कोबीशी प्रेम विवाह केला.
दुसरया दिवशी कांदयाला मित्र विचारायला लागले,
...काय मित्रा, लग्नाची पहिली रात्र कशी होती?
कांदा : अरे कसली डोंबल्याची रात्र, एकमेकांचे कपडे उतरवेपर्यंत सकाळ झाली.

मराठी भाषा...!!
मराठी भाषा फारच अजब आहे ना...??
...गाडी 'बिघडली' असेल तर म्हणतात 'बंद' आहे.
.आणि पोरगी बिघडली असेल तर म्हणतात 'चालू' आहे.......


झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?
पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.
झंप्या : म्हणजे?
पंप्या : अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.
झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.
पंप्या : हो रे...पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

कावळा : चिऊताई, चिऊताई, दार उघड!
चिमणी : थांब माझ्या बाळाला पावडर लावते...
कावळा : माझ्या सोबत माझी मुलगी पण आहे..
बाळ : आई, पावडर मी लावतो, तू पहिले दार उघड!!!


प्रियकर - प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?
प्रेयसी - काय करशील?
प्रियकर - तू सांगशील ते करीन!
प्रेयसी - मग आधी नोकरी कर.
प्रियकर - का?
प्रेयसी - म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!


रामू - ए राजू, तुला मी एका सेकंदात अख्खे गाणे म्हणून दाखवू?
राजू - शक्यच नाही, चल म्हणून दाखव पाहू.
रामू - गा S S णे!
राजू - अरे वा! चल, मीसुद्धा तुला फटाका न फोडता अगदी तुझ्या दोन्ही कानांजवळ फटाक्याचा मोठा आवाज काढून दाखवतो.
रामू - दाखव की…त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच राजू त्याच्या कानांखाली पेटवतो
फाट…. फाट…



पुण्यातल्या पोरीला बर्थ डे गिफ्ट काय द्याल ????.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१ डझन स्कार्फ :) :)



मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला
तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..



दादा कोंडकेंनी आपल्या पणजीच्या स्मरणार्थ बैंक सुरु केली तीचे नाव ठेवले:
:
:
:
:
:
"आयच्या आयची आय ब्यांक "


संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस.


पक्या : डार्लिंग, तुझ्या आयुष्यात मी पहिलाच आहे ना,ज्याने तुझं चुंबन घेतलं?
चिंगी : अर्थातच सोन्या, पण मला हे कळत नाही कि सगळे जण हाच प्रश्न का विचारतात.

रजनीकांत च्या काही सत्य कथा !!!!!

गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.

संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.

एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.

अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले होते, ‘रजनी कान्ट!’

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा करेल?

रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं.. त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.

एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं म्हणे!

रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल.

एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत जगात काहीही नसतं!’’

एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे रेटिंग दिले.

देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे उद्गारतो.

रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.

Tsumani कशा तयार होतात.. अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे.. प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?

लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.

न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती आजतागायत आंधळी आहे.

रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.

रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.

पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.

इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.

रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग

मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.

रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे जाहीर करून टाकले.

रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’

संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन रजनीकांत होते.

रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.

प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.

एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक रजनीकांत फरारी झाला आहे.

रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून, ब्लूटुथवरून.

‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.

रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’
दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’

प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’
मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’
प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’

‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल सूर्याला नाहीतर चंद्राला!’’

एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी डार्लिग या नावाने ओळखते.

एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात आला.

एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.

एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड, जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना रास्कला.’’

एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच आता आपण सूर्य म्हणतो.. सिगारेट फेकणा-या माणसाचं नाव सांगायलाच हवं का?

एकदा रजनीकांतने संतापून झाडू मारणा-या एका पो-याला लाथ मारली.. तो झाडूसह आकाशात फेकला गेला.. आज लोक एकदा रजनीकांत कपातून चहा पीत होता. तो त्याला जरा जास्त झाला. त्याने हातातल्या सुरीने चहा अर्धा कापला.. तीच जगातली पहिली ‘कटिंग चाय’ होती.

हृतिक रोशनने रजनीकांतशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला.. ‘गुजारिश’मध्ये बिचा-यावर संपूर्ण सिनेमाभर व्हीलचेअरमध्ये बसून राहण्याची पाळी आली.

एकदा रजनीकांतने अलका कुबलला एक तास हसवले!!!

रॉजर फेडरर म्हणाला, ‘‘मला टेनिसबद्दल काहीही विचार.. मला सगळं काही ठाऊक आहे?’’ रजनीकांतने विचारलं, ‘‘नेटमध्ये भोकं किती असतात?’’

ध्वनीपेक्षा जास्त स्पीड कोणाचा असतो?.. प्रकाशाचा.. तुम्ही ‘रजनीकांत’ असं उत्तर देणार होतात, हो ना? पण, रजनीकांतचा वेग कोणत्याही मापात मोजता येत नाही.
दिवाळीत रजनीकांत फटाक्याने उदबत्ती पेटवतो.

रजनीकांत कॉलेजात शिकत होता तेव्हा प्रोफेसरच लेक्चर बंक करायचे.

कांद्याच्या किंमती इतक्या भडकल्यात की आता रजनीकांतनेही जैन व्हायचं ठरवलंय.

एकदा रजनीकांत एका खलनायकाच्या कानात काहीतरी पुटपुटला आणि तो खलनायक जागीच गतप्राण झाला.. रजनीकांत त्याच्या कानात फक्त एवढंच पुटपुटला होता, ‘ढिशक्यांव!!!!’

सुपरमॅन आणि रजनीकांत यांनी एकदा एकमेकांशी पैज लावली होती.. जो पैज हरेल, त्याने उरलेल्या संपूर्ण आयुष्यात अंडरवेअर बाहेरच्या कपडय़ांच्या वर घालायची असं ठरलं होतं..

‘मिशन इम्पॉसिबल’ हा सिनेमा टॉम क्रूझच्या आधी रजनीकांतलाच ऑफर झाला होता.. रजनीकांतने तो नाकारला.. सिनेमाचं शीर्षक त्याला फारच अवमानकारक वाटलं म्हणे!

एका हाताने पन्नास मोटारी कोण थांबवू शकतो?.. ट्रॅफिक हवालदार.. सगळय़ा गोष्टी रजनीकांतच करू शकतो की काय?

रजनीकांतने एकदा आत्मचरित्र लिहिले.. त्यालाच आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स या नावाने ओळखतो.

मानवतेवर उपकार करा आणि रजनीकांतवरचे वेडेवाकडे विनोद एकमेकांना फॉरवर्ड करणे बंद करा.. नाहीतर.. नाहीतर तो एखाददिवशी संतापून इंटरनेटच डिलिट करून टाकेल!!

नव्या वर्षाची भेट
फेकिया कंपनीचा नवीन रजनी सिरीजचा ताकदवान आर-11 मोबाइल
एकावेळी 10 सिमकार्ड सामावून घेणारा
500 जीबी मेमरी
320 मेगापिक्सल कॅमेरा
शिवाय टीव्ही, फ्रिज, एसी आणि कार.. एकाच मोबाइलमध्ये

2012 सालापर्यंत जगभरातील लोक कम्प्यूटरमध्ये अतिशय ताकदवान हार्डडिस्क वापरू लागतील.. जिची क्षमता मेगा बाइट्स, किलोबाइट्स किंवा गिगाबाइट्समध्ये नव्हे, तर रजनीबाइट्समध्ये मोजली जाईल.

आदर्श सोसायटीच्या बद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोनिया गांधींना काय स्पष्टीकरण दिले?.. ‘‘ती इमारत सहाच मजल्यांची होती मॅडम. रजनीकांतने खेचून 31 मजल्यांची केली!!!’

चीन, पाकिस्तान, बांगलादेश हे सगळे भारताचे शत्रू उत्तरेलाच का आहेत?.. कारण, दक्षिणेला रजनीकांत आहे!!!

रजनीकांतचा जन्म 30 फेब्रुवारी रोजी झाला.. त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.

रजनीकांतने दात मजबूत व्हावेत म्हणून लहानपणी एक खास टूथ पावडर वापरली.. तिलाच आपण आज ‘अंबुजा सिमेंट’ म्हणून ओळखतो.

रजनीकांत जेव्हा ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात आला होता, तेव्हा त्याला विचारण्याच्या योग्यतेचा प्रश्न विचारण्यासाठी कम्प्यूटरला हेल्पलाइनची मदत घ्यावी लागली होती.

गॅलिलिओने दिव्याखाली अभ्यास केला.
ग्रॅहॅम बेलने अभ्यासासाठी मेणबत्ती वापरली.
शेक्सपीयरने रस्त्यावरच्या दिव्यांखाली अभ्यास केला, हे सर्वानाच ठाऊक आहे.
रजनीकांत मात्र केवळ उदबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करून शिकला, हे फारसं कोणाला माहिती नाही

Upcoming Horror movies in IT.......

Upcoming Horror movies in IT.......

(1) Darinda manager, tadapta associate ... !!!!

(2) Zahreela Cafetaria .. !!!

(3) Who Akhri Mail………………

(4) Adamkhor supervisor

(5) Escalation- A Life in trouble

(6) 9 Ghante 30 Minute

(7) Ichadhari Customer

(8) I still know what you Missed(goals) last summer

(9) Release ki Raat

(10) Do Excel aur Barah PPT

(11) REGRESSION - RELOADED

(12) Miss– Mano ya na Mano…………….!!!

(13) Zahereelee Defect

(14) Evil DM

(15) Bhut wala Floor

(16) Dashboard- The mystery continues………

(17) “ENTER” mat dabana………….

(18) Andha Cab driver… !!!

(19) Sunsan Pantry– A murder mystery.. !!!

(20) Recession – Jaani dushman

Few more

--- A ppraisal K i P yaas
--- B adla D eveloper K a
--- T rainer B ana S haitaan
--- M anager ki C heekh
--- C lient K a Q aher!!!!!!!!!!!
---Weekend ka V iraana C ubicle!!!!!!!!!!!!!

---- One night at the Khauff center

and the ultimate...............................

Last but not the least ...................................
............................................................................

Khooni Call

तुझं माझ्यावर प्रेम का आहे ??

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,

एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते,
प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे?
प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे.

प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे?
प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन.

प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय करणार... छे! :(
माझ्या मैत्रिणीचा प्रियकर बघ, तिला किती काय काय सांगत असतो ... तिच्या सौंदर्याचे किती पूल बांधत असतो आणि तुला साधं एक कारण नाही सांगता येत. :(

प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम करतो ...

- कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस
- तुझा आवाज खूप गोड आहे.
- तु खूप प्रेमळ आहेस, माझी काळजी घेतेस...
- तु खूप सुंदर विचार करतेस
- तुझे हास्य अगदीच लोभस आहे..
- तुझ्या प्रत्येक हालचाली मुळे (अदा : अगदी योग्य वाटते...)

प्रेयसीची कळी आता एकदम खुलते.

काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक अपघात होतो आणि ती कोमात जाते.

प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले असते,

प्रिये,

तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण तु आता बोलू शकत नाहीस. म्हणुन मी आता तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.

तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो.
पण आता तु माझी काळजी घेवू शकत नाहीस, म्हणुन मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत.

तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत होतो.
पण आता तु हसु शकत नाही, इकडे तिकडे फ़िरू शकत नाहीस. त्यामुळे मी तुझ्यावर
प्रेम नाही करू शकत.

जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम
करावे असे तुझ्यात काहीच नाही.

काही दारोळ्या!

प्यायला लागल्यावर चढायचीच
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही
दारु पिताना एक तत्व पाळावं
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ?
उरली , तर घरी न्यावी!
एक एक पेग कसा
चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा
हिशेब असतो द्यायचा
दारू पिऊन झाल्यानंतर
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते
पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे
मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो
ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये
वेळच्यावेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी
पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही
आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसऱ्याला घेऊ देऊ नये
दुसऱ्याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये
अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो
आपला पेग आपण भरावा
दुसऱ्यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास , आपली बाटली
दुसऱ्यांच्या हातात देऊ नये
असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!
एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय , माझी काय
नशा कधी सरू नये
तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,
पण दारू अशी सांडू नकोस
आपला आवाज दणकयात हवा
उगाच लाऊडस्पीकर कशाला ?
पिऊन प्यायची तर देशी प्यायची
उगाच फॉरीन लिकर कशाला ?
फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही
घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे , बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात
आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही
हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा , माझ्या इतकी
पचवून दाखव , नंतर बोल!
प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र
पिणाऱ्यांनी समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा , जिथे , जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये
प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास

Sunday, January 9, 2011

इतकी का सुन्दर दिसतेस तू...

इतकी का सुन्दर दिसतेस तू...
मी विचारल्यावर
हळूच गालात का हसतेस तू...
उघड कधीतरी हे रहस्य
ही कसली जादू केलीस तू...

तुझ्यातच माझं मन रमत
तुझ्या सहवासताच ते हसतं
का समजुन घेत नाहीस तू...
इतकी का सुन्दर दिसतेस तू...

मनाच्या चित्रात रंगवल य तुला
प्रत्येक कवितेत कोरलय तुला
नाही भेटत कधी मला तू...
तरी खुशाली का पुसतेस तू...
इतकी का सुन्दर दिसतेस तू...

डोळे बंद करताच येतेस तू...
डोळे उघडताच जातेस तू...
एवढच तुझं माझं नातं
नसतानाही माझ्या सोबत असतेस तू...

त्रासदायक नवरे : शरद उपाध्ये


ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्या निमित्त त्रासदायक नवरे : शरद उपाध्ये

भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात. नवरे
मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो.

आदर्श नवरा दाखवा , हजार रुपये मिळवा !!!!!

खरोखरच आपल्या बायकोच्या पसंतीला उतरणे हे बाहेर काढलेली टूथपेस्ट आत घालून दाखविण्याइतके कठीण काम. सदेह वैकुंठाला गेलेले संतश्रेष्ठ तुकाराम महाराजसुद्धा एकदा वैतागून म्हणाले होते...

तीर्थ करूं जाता म्हणती कावळा , न करिता त्याला म्हणती बावळा
फार खाय त्याला म्हणती अघोरी , राक्षस हा असे खादाड भारी
थोडे खाय त्याची करिती टवाळी , अन्न कैसे पाप्याच्या कपाळी
तुका म्हणे किती राखावी मर्जी , संसाराचे त्रास घेता.

बायका नाट्य-समीक्षकांसारख्या असतात. विनोदी नाटक काढले , तर म्हणतात, 'अर्थहीन धांगडधिंगा ' गंभीर नाटक काढले , तर म्हणतात , ' रिकाम्या नाट्यगृहातील अयशस्वी निर्माता.' ऐतिहासिक नाटक काढले , तरी टीका , सामाजिक नाटक काढले , तरी टिंगलीचा सूर. म्हणून म्हणतात , ज्याला रस्ता माहीत असतो , पण ड्रायव्हिंग करता येत नाही , त्याला टीकाकार म्हणतात.

नवरे मंडळींचे तेच प्रॉब्लेम्स असतात. कसेही वागले , तरी तो त्रासदायकच वाटतो. रसिक नवरा प्रेमाने बायकोला म्हणतो , '' तुझा चेहरा कसा चंदासारखा सुंदर दिसतोय.
'' तर लगेच ती म्हणते , '' काय हो हा तुमचा नेहमीचा टोमणे मारण्याचा त्रास! सरळ का नाही सांगत की , माझ्या चेहऱ्यावर डाग आहे म्हणून ?''

हनिमूनहून परतलेली स्मिता आईला सांगत होती , '' हा म्हणजे न अगदी येडचॅपच आहे. जाताना गाडीत अगदी वेगळा , घोगरा आवाज काढून माझा हात हातात घेऊन म्हणाला,
'स्मितू , अखेर आपण दोघे एकरूप झालो. ' अग , मला एवढी भूक लागली होती आणि हा अगदी बोअर करत होता. शेवटी मी त्याला सांगितले , ' जेवणाची ताटे दोघांची वेगवेगळी सांगा हं ! ''

ज्योतिषशास्त्र खरे की खोटे- ज्याचे त्याचे मत असू शकते ; पण त्यानिमित्त भविष्य विचारायला आलेल्या हजारो लोकांच्या , विशेषत: बायकांच्या समस्या त्यातही नवऱ्यांच्या त्रासदायक समस्या ऐकून खूप मौलिक अनुभव येतात.

एकदा माझा कार्यक्रम संपल्यावर एक बाई तावातावाने आत येऊन म्हणाल्या , '' अहो मेष राशीचे पुरुष तडफदार असतात , असे मी वाचले आहे. पण माझा नवरा तर अगदीच मेषपात्र आहे. ''

आणखी एक तक्रार त्रासदायक नवऱ्यांबद्दल बायका नेहमी करतात , '' आमचं हे येडं श्रावणबाळ आहे. बायको घरी आली , तरी आईचा पदर काही सोडत नाही. कोणत्याही वेळी आई अशी हाक मारतो. ''

हळवा नवरा बायकांना विलक्षण तापदायक वाटतो. लग्नानंतर काही महिन्यांतच कविताला दिवस गेले. मधून मधून उलट्या होऊ लागल्या आणि ती इतकी आनंदित झालेली असताना
तिचा नवरा मात्र डोळ्यांत पाणी आणून म्हणाला , '' काऊ , किती ग त्रास होतोय तुला! खरंच ग , स्त्रीचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी. '' आणि तिच्या मांडीवर झोपून हुंदके देत म्हणाला , '' देवा , देवा माझ्या काऊचे कष्ट मला दे. तिला सोडव. ''

माझ्या पती पीडित भगिनींनो आणि मातांनो , काऊची अवस्था त्या वेळी किती केविलवाणी झाली असेल , याची कल्पना फक्त तुम्हालाच करता येईल.

नवऱ्याचा अतिसभ्य सुसंस्कृतपणाही बायकांना तापदायक ठरतो. मध्यमवय उलटून गेलेल्या वर्षाताई थोडे थट्टेने , थोडे वैफल्याने , थोडे वैतागून सांगत होत्या, '' माझे मिस्टर म्हणजे कातिर्कस्वामीच. आठवड्यातले चार दिवस उपास. पुन्हा एकादशी , संकष्टी वेगळीच. सोमवारी शिवलीलामृत , गुरुवारी गुरुलीलामृत , शनिवारी शनिमाहात्म्य. तास न् तास पारायणे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी थोडा एकान्त मिळाला म्हणून मी हळूच त्यांच्या छातीवर मस्तक टेकले , तर दूर होऊन म्हणाले , ' अगं , आज माझी एकादशी आहे. '

आम्ही हनिमूनला जायचे ठरवले , तर म्हणाले , ' आपण सोलापूरला जाऊ. तेथून गाणगापूर , तुळजापूर , पंढरपूर सगळेच जवळजवळ आहे. '

प्रवासातही ते हनुमान चालिसा , शिवस्तुती , दासबोध वाचतच होते. हॉटेलवर पोहोचल्यावर हे लगेचच आंघोळीला गेले. मी चेंज करीत होते , तेवढ्यात यांनी बाथरूमचे दार उघडले आणि ' सॉरी , सॉरी ' म्हणत पुन्हा बंद केले. नंतर आतूनच विचारले , ' झाले का ग तुझे ?''

तशी वर्षाताईंना तीन मुले आहेत , पण सांगताना त्या म्हणतात , '' मला चार मुले आहेत. हा सगळ्यांत मोठा. ''

आळशी नवरेही बायकांना फार त्रासदायक वाटतात. बरेचसे नवरे रोज दाढी करत नाहीत. केली तर जमिनीवर आरसा ठेवून , मांडी घालून अर्धा-अर्धा तास दाढी करीत बसतात. साबणाचा फेस लावलेल्या भयानक चेहऱ्याने मध्येच पेपर वाचतात. मधूनच गाल खरडतात. तो साबणाचा फेस वाटीतच बुडवून ठेवतात. नंतर ती वाटी तशीच ठेवून सरळ आंघोळीला जातात.

सारख्या जांभया देणे , जांभया देत बोलणे , प्रचंड मोठी ढेकर देणे , सारखे आडवे होऊन झोपणे असे वागणारे नवरे काय भयंकर पीडाकारक असतात , ते समजण्यासाठी त्यांच्या बायकांच्या जन्मालाच जावे लागेल. कोणताही पीडाहारी झंडू बाम त्यांच्या डोकेदुखीला उपयोगी ठरत नाही.

एक नवरा सारखा झोपून राहायचा. त्याचा तापट मुलगा सारखा आरडाओरडा करायचा. एकदा त्याची झोपमोड झाली म्हणून तो रागावला , तर बायको म्हणाली , '' झोपलेल्या बैलापेक्षा भुंकणारा कुत्रा थोडा तरी कामाचा असतो. ''

नवऱ्यांचा, बायकी चौकशा करण्याचा स्वभाव तर बायकांचा रक्तदाब हमखास वाढवतो. एक इसम , बायकोच्या मैत्रिणी आल्या की , सरळ त्यांच्या कोंडाळ्यात जाऊन बसायचा. भयंकर नाजुक-नाजुक बोलायचा. एकदा बायकोच्या मैत्रिणीला म्हणाला , '' वहिनी,साडी नवी वाटतं ?'' ती म्हणाली , '' छे हो , जुनीच आहे. '' परत तो म्हणतो , '' नाही , अंगावर कधी दिसली नाही , म्हणून विचारले हो सहज. '' तेव्हापासून ती बाई
अंगभर पदर घेऊ लागली.

सारखी सिगरेट फुंकणारे किंवा तोंडात तंबाखू विरघळल्यामुळे लाळ सुटलेली असतानाही वर तोंड करून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करणारे नवरे बायकांना भयानक उपदवी वाटतात. काही नवरे येता-जाता आरशात बघून केस सारखे करतात, पावडर लावतात, वळून -वळून सगळ्या अँगल्सनी आरशात बघतात , हे तर बायकांना चीड आणते. स्वयंपाकघरात मदत करतो असे सांगून काहीबाही तोंडात टाकत राहणारे नवरेही बायकांना असह्य वाटतात.

बायकोकडे सारखी मेहुणीची चौकशी करणे , सासूबद्दल विचारणा करणे , बायकोच्या मैत्रिणींच्या स्मार्टपणाचे कौतुक करणे , तिच्या वडिलांच्या इन्कमची चौकशी करणे, 'मी पण बिझिनेस करावा असे म्हणतोय ' असे नुसते म्हणत वर्षानुवर्षे पोस्टात नोकरी करीत राहाणे , अशा नवऱ्यांचा बायकांना फार संताप येतो.

कुठल्याही क्षणी लादेन येईल आणि बॉम्बस्फोट करेल अशा चेहऱ्याने वावरणारेही काही नवरे असतात. भयरसाचा अतिरेक झाल्यामुळे हास्यरस लोप पावलेला असतो. असे नवरे क्वचित हसले , तर त्यांच्या बायकांना बंपर लॉटरी लागल्यासारखे वाटते. हे सारखे काळजीत असतात. जरा दुखले , खुपले की , त्यांना भयंकर रोग झाल्याच्या भावना होऊ लागतात. बायको ' डॉक्टरांकडे जाऊ या ' म्हणाली , तर टेस्ट करून घ्यायलाही
घाबरतात. अशा नवऱ्यांच्या बायकांना कायमची सदेह साडेसाती असते. असे नवरे बायकोचा कोणी अपमान केला , तरी तिचीच समजूत काढतात , '' जाऊ दे ग , तू लक्षच देऊ नकोस. ''

गुळगुळीत दाढी केलेल्या, गोल बायकी चेहऱ्याचे, काळ्याभोर डोळ्यांचे, हळुवार आवाजात गोड-गोड बोलणारे , नाजुक-नाजुक हसणारे , लाजरे-बुजरे पुरुष तर बायकांच्या डोक्यात जातात. काही पुरुष तर बहिरे असल्यासारखे दिसतात. पटकन प्रतिक्रिया देत नाहीत. बायको काही बोलली की , पेपरमधले डोकं वर काढतात , अतिशय निविर्कारपणे तिच्याकडे पाहातात , पुन्हा पेपरमध्ये डोके घालतात.

नवऱ्यांच्या जेवणाचे प्रकारही विचित्र असतात. काही नवरे भुरके मारतात की बोंब मारतात , तेच तिला कळत नाही. मध्येच अ आ इ ई ची बाराखडी म्हटल्याप्रमाणे प्रदीर्घ ढेकर देतात. काही नुसते खातच राहतात. बायकोने सहज विचारले , '' खीर आवडली का हो ?'' तर भडकून म्हणतात , '' भुरके मारतोय , दिसत नाही का ?'' काही नवऱ्यांची बोलण्याची हिंमत नसते. भाजीत मीठ विसरलेले असले , तर मुलाला म्हणतात, ''
अरे बंडू बाजारात मीठ महाग झाले आहे का ?''

काही संतापी नवरे पोळीचा तुकडा हातात धरून खेकसतात , '' ही पोळी आहे का चामड्याचा तुकडा ?'' आणि बायकांना संतापजनक वाटणारे नवरे म्हणजे अर्धा-अर्धा तास भात चिवडत बसून मिचिमिची जेवणारे
आणि चप् चप् असा आवाज करणारे नवरे...

... बायकांना खूप-खूप आवडणाऱ्या एका तरी परिपूर्ण नवऱ्याची पत्रिका पाहाण्याचा
योग माझ्या पत्रिकेत आहे का , याचा सध्या मी अभ्यास करीतआहे