Tuesday, April 26, 2011

एक सर्व्हे- आय.टी. कामगारांचा !


* १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.

* २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला)

* ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही.

* ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???)

* ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते.

* ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.

* ७०% आय.टी. कामगार (जगभरातील) रोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात.

* ८०% आय.टी. कामगार आपल्या पालकांजवळ राहत नाहीत.(खरं आहे)

* ९०% आय.टी. कामगार हे स्वत:चे जीवन,बायको,प्रोजेक्ट डेडलाईन,पगारवाढ,भत्ते,ऑनसाईट भेटी,कंपनी च्या ग्राहकांची खुशमस्करी, बढती,विसा स्टेटस,कमीटमेंट याबद्दल कधीच समाधानी नसतात.

* १००% आय.टी. कामगारांना आयुष्यात एकदा तरी असतं वाटतं कि आय.टी.सोडून इतर क्षेत्रात काम केलं असतं तर बरं झालं असतं.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Wednesday, April 20, 2011

केलेस लग्न का तू ? एक व्हिजन

आयुष्य आज माझे मोडीत काढले मी !
स्वर्गातुनी सुखाच्या पाऊल काढले मी !!

ती बोलते अशी की, मी कोण घोर पापी !
भाळूनिया दिवाळे माझेच काढले मी !!

तो हो तिचा नगीना, माझ्या गळ्यास फाशी !
फासातुनी कितीदा मानेस काढले मी!!

वैतागलो जिवाला, पण कीव येत नाही !
श्वासात वेदनेचे हुंकार काढले मी !!

"जाशी बळेचि तूही का बावळ्या हलाली !"
त्यांनी दिले इशारे, वेड्यात काढले मी !!

"केलेस लग्न का तू? नाही? नको करू रे!"
ती घोडचूक एक" - अनुमान काढले मी !!

हा 'जीत' चीत झाला झेलून रोज हल्ले !
माझ्यातल्या विजेत्यां बाहेर काढले मी !!

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Saturday, April 16, 2011

एका सरड्याने इतके रंग बदलले

एका सरड्याने इतके रंग बदलले
की त्याला स्वत:चा खरा रंग कळेना
त्याने खूप विचार केला तरी
तो कसा होता ते
त्याला काही केल्या आठवेना

तो म्हणाला,
"मी आकाशाला निळा वाटतो
मी गवताला हिरवा वाटतो
मी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो
मी खरा कसा ते, कोणाला कळतं
वेगळा आहे ते कोणाला कळतं"

मग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं
एकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं

गवतावरच नाही तर
मातीवर पण तो रहायला लागला हिरवा
त्याला काही खोडकर मुलांनी
मातीवर ओळखलं परवा

त्याला या खऱ्या रंगाने
त्याचा वेगळेपणा दाखवला
आणि या खऱ्या रंगामुळे
त्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला

सरडा मेला तरी
लोकांना जिवनाचा नियम कळावा
चार-चौघात गेल्यावर आपण
त्यांच्याप्रमाणे रंग बदलावा
कितीही वाईट वाटलं तरी
आपला खरा रंग लपवावा
कारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं
आणि मग स्वत:च घातक बनून
आपल्याला आपला रंग बदलायला लावतं

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

प्रेम म्हणजे काय असतं

मनाची गोष्ट का
भावनांचा खेळ..

एक-मेकांना समजणे
का शब्दांचे ते खेळ..

तुझे-माझे करणे
का तुझ्यात मी असणे..

एक-मेकां वर रुसणे
का एक-मेकांना मनवणे..

एक-मेकांशी भांडणे
का वेळेस प्रेमाने सॉरी म्हणणे..

रात्री फोन वर तासन-तास गप्पा मारणे
का बोलता बोलता मधेच झोपणे..

दोघांनी एकाच नजरेने पाहणे
का एक-मेकांच्या स्वप्नासाठी प्रयत्न करणे..

एक-मेकांच्या आवडी-निवडी लक्षात घेणे
का तिला जसे आवडेल तसेच राहणे..

प्रेमात एक आलिंगन देणे
का दुखात त्याच खांद्यावर डोके ठेवून रडणे..

रात्र-दिवस तिचा विचार करणे
का तिच्या शिवाय काही उमजणे..

प्रेमात उंच असे मनोरे बांधणे
का ती सोडून गेल्यावर तेच मनोरे तुटणे..

तिच्यासाठी काहीही करायला तयार होणे
का ती सोडून गेल्यावर जीवही द्यायला तयार राहणे...

हेच कोडं मनात असते...
नाही सुटत अजूनही ते कि नक्की

........प्रेम म्हणजे काय असतं........

Thursday, April 14, 2011

मूर्तिकार ...

मी तिला असं दुःखवायला नको होतं……

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
मी तिला असं दुःखवायला नको होतं…
हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
मी कधी याचा विचारच का केला नाही?

आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
पण तरीही ती माझीच होती,
कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
झालं गेलं विसरून जां !! असं म्हणायला पाहिजे होतं,
पण कुणी?, मी नाही म्हटलं… तिनं तरी??

तिला काय वाटत असेल आत्ता?
जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का…?
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक …पण,
मी काय करू? काय नको ? …असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
मी काहीच बोललो नाही.

बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो,
पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
शेवटचा निर्णय तिचाच होता ,
त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं,
दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो, पण.. आत्ता वाटतं..
मी तिला असं दुःखवायला नको होतं…

मी तिला असं दुःखवायला नको होतं……

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Monday, March 14, 2011

एका खरया क्रिकेट वेड्याने आपल्या मैत्रिणीला लिहिलेले पत्र

प्रिये

१) पुढचा सर्व महिनाभर मी फक्त माझ्या मित्रांशीच जास्तीत जास्त वेळ बोलेन. त्यांच्या घरी मॅच पहायला जाईन किवा त्यांना माझ्या घरी बोलवेन.. त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही ही भुणभुण करायची नाही. केल्यास दुर्लक्ष केले जाईल.


२) माझा फोनही याकाळात बिझी असेल तेव्हा फोन घेतला नाही म्हणून सतत करायचा ...नाही एसएमएस पाठवायचे नाहीत. इग्नोरच केले जातील. फोन बिझी असला तर मी क्रिकेटवर चर्चा करतोय असे वाटून गप्प बसायचे.

३) समजा, एखाद्या दिवशी मी भेटलोच. भेटेनच असे नाही, मॅच बुडवून तुला भेटायला येण्याचे कष्ट मी घेणार नाही. पण तरी आलोच एखाद्या मॅचच्या दिवशी आणि नाही फार बोललो तर त्याचे भलतेसलते अर्थ काढायचे नाहीत. तुझे माझ्यावर प्रेमच नाही, तू दुसरीकडे कुठं अडकलास का, तू का असा वागतोस माझ्याशी, अशी भंकस करायची नाही. मी काहीही ऐकून न घेता निघून जाईन आणि वर्ल्डकप संपेपर्यंत भेटणार नाही.

४)भेटणे-जेवायला जाणे-पार्ट्या-तुझ्या मैत्तिणींचे वाढदिवस असे सगळे कार्यक्रम रहित करण्यात येतील. कुठल्याही प्रकारचा आग्रह करण्यात येऊ नये.

५) सगळ्यात महत्वाचं, तुला क्रिकेटमधलं काहीही कळत नाही असं सांगण्याची वेळ माझ्यावर आणायची नाही. 'आज कोणाची मॅचे..?' असं लाडात येऊन विचारल्यास आपलं ब्रेकअप होण्याची शक्यता आहे. किमान रोजचा पेपर वाचायचा, किमान भारताची मॅच कधी आहे हे पहायचं..आणि प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत.

६) मुलींना फारसं क्रिकेट कळत नाही हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे उगीच आपल्याला फार कळतं अशा अविर्भावात माझ्याशी चर्चा करायला यायचं नाही. चर्चा केली जाईल, पण तेव्हा मी जे काही सांगतोय ते केवळ भक्तीभावानं ऐकून घ्यायचं. क्रिकेटविषयी क्रिकेट सोडून बोलायला तू काही मंदिरा बेदी नाहीस हे लक्षात ठेवायचं.

७) मी मॅच पाहत असताना फोन करुन 'रोमॅण्टिक' गप्पा मारण्याचा प्रयत्नही करायचा नाही. मॅचमधला रोमॅण्टिसिझम मला पुरतो.

८) सचिन तेंडुलकर कितीही आवडत असला तरी ' ए, हा मारेल का आज सेंच्युरी..?' असले बावळट प्रश्न विचारायचे नाहीत..बावळट यासाठी की तेव्हा सचिन नाही तर सेहवाग किंवा युसुफच क्रिझवर असतो..उगीच 'स्मार्ट'नेस दाखवायचा नाही.

९) प्रेमापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं असतं हे तू लक्षात ठेव, त्यामुळे 'तूला माझ्यापेक्षा क्रिकेट जास्त महत्वाचं वाटतं का..?' असा प्रश्न विचारायचा नाही. मी होकारार्थी उत्तर दिल्यास परिणामांना जबाबदार राहणार नाही.

१०) सगळ्यात महत्वाचं..हे सगळे नियम पाळले गेल्यास आणि माझ्या मनाप्रमाणे सगळ्या मॅचेसचे निकाल लागत गेल्यास मी कधीमधी एखादा फोन करीन..तेव्हा तू प्रेमाने आणि (थोडावेळच) बोलणे बंधनकारक आहे

प्रेयसी कशी असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

चश्मेबद्दुर .. खुबसुरत नसली तरी,
चारचौघीत उठून दिसणारी असावी

ग़ालिबाची शेर -ए-गझल नसली तरी,
माझी एक छानशी चारोळी असावी

यश-राज पिक्चरची हिरॉईन नसली तरी,
पण घराला घरपण देणारी नाईका असावी

बागेतल्या फुलांसारखी सुंदर नसली तरी,
पण अंगणातल्या तुळसेसारखी पवित्र असावी

हाय... हेलो... नया दौर असला तरी
नव्या जुन्याची सांगड घालणारी असावी

ड्रीम-गर्ल नसे ना ...पण मनाने सुंदर असावी
नात्यांच्या नाजुक धाग्यांना हळुवार जपणारी असावी

ओळख असून सुद्धा अनोळखी वाटत राहावी
तिला ओळखण्याची दिनरात माझी धडपड चालावी

केव्हातरी कुठेतरी ती भरभरून व्यक्त होणारी असावी
मनाचे गुपित मग डोळ्यांनीच सांगणारी असावी

थोडी खट्टी...थोडी मिठी असावी
तिच्या लटक्या रुसण्या फुगण्यात मज्जा असावी

हसताना गोबऱ्या गालावर नाजुक खळी पडावी
त्या खळीत सदा पाडण्याची मग माझी रीतच व्हावी

इवल्याश्या नाकावर राग घेऊन वाट पाहणारी असावी
मी उशीर केला तर मग माझ्यात मिठीत रडणारी असावी

चोरून चोरून भेटायला येणारी असावी
हातात हात घालून मग सगळ्यांसमोर फिरणारी असावी

तिच्यासोबत आयुष्य ही एक वेगळीच बात असवी
सुख आणि दुःखात सदा दोघांची साथ असावी

जितकी कोमल तितकीच कठोर वागणारी असावी
माझ्या नकळत माझे आयुष्य फुलवणारी असावी

आयुष्याच्या अनेक वळणांवर साथीस असावी
भग्न स्वप्नांच्या वाटेवर नव्या स्वप्नांची ती उमेद असावी

प्रेमाला प्रेम समजणारी ती प्रेयसी असावी
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी असावी

तेल आणि वात यांसारखी आमची जोडी असावी,
एकरूप होऊन जळताना इतरांना प्रकाश देणारी असावी


पण की माहित माझ्या नशिबी ही प्रेयसी येईल का नाही

दोन शब्द आईसाठी

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील