Sunday, January 9, 2011

‘अंधारात कसा चढणार डोंगर?’

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊ जाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली.

अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती? जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला.

कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्टदिशी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला. 'राम राम पाव्हनं का असं निजलात?' म्हातारा आवाज होता.

शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता. शेतकरी म्हणाला, ''राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.'' म्हातारा हसला.... म्हणाला, ''अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?''

''एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त दिसतंय याच्या प्रकाशात.'' तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ''अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.''

म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा!
वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

संकल्प करा : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.

घटस्फोट ....

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."
तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तीलासांगितलं, मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न मोडायला नेमकं काय आहे ? हे तिला जानुन घ्यायच होत; पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.
माझा बँक balance कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवशी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इच्छा होती. तिची कारणे साधी होती. महिन्याभरात आमच्या मुलाची परिक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती. लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली. घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेताना माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नीट बघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवळिकच संपली होती. जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने कार चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता.

मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे- जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा. नाही तर पश्चाताप......"

कधी कोणावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ती वैतगली होती.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..

माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.

वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..तीम्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाही.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..

अग पण, तो बोलायच्या आतच ती म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..

१४ फेब्रुवारी चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.

ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..

तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.

ती खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १४ फेब्रुवारीला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.

त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ती..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ती हासली. .....
continue.....

ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ती हासली.

१४ फेब्रुवारी तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ती ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ती आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.

कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ती त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ती वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.

अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ती हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाही जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..

जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ती म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ती म्हणाली. सॉरी..

तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाही
. निघते.. ती म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..

तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकराननी टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटरनॅशनल टर्मीनल.

टॅक्सी वेगात चालली होती,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल व भाड देवुन तो निघाला,

सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.....

आधी विचार करा, मग कृती करा!!!

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

प्रेम म्हणजे काय,
हे कधी कुणाला कळलेच नाही
छोटे से कोड ते,
पण कधी कुणाला उलगडलच नाही...

का जीव होतो वेडा पिसा,
जेव्हा येते तिची आठवण
हृदयात केलेली असते तिच्या,
छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...

मनाला तिच्या शिवाय
काही दुसरे सुचत नाही
पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा
असेही कधी वाटत नाही...

रात्री छानच असतात ...
तिच्या स्वप्नानी भरलेल्या
देऊन जातात उभारी ...
मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...

प्रेम कधी सफल होते तर कधी होत नाही...
ते जीवनात कधीही सब कूछ नसत
पण तरीही हृदयाच्या एका कोपर्‍यात
ते नेहमीच जपायाच असत...

प्रेमाचे हे कोड कदाचित
कधीच कुणाला उलगडणार नाही,
पण त्या साठी हे जग
प्रेम करायचे कधीहि थांबणार नाही...

प्रेम करायचे कधीहि थांबणार नाही...

सर्वात म्हातारा बाप


एकदा एक ९० वर्षाचा म्हातारा डॉक्टरकडे जातो आणि म्हणतो कि त्याच्या बायकोला ( वय ३० ) दिवस गेलेत. डॉक्टरला अशाचार्या वाटत,

मग डॉक्टर त्याला एक गोष्ट सांगतो .... कि एक माणूस छत्री घेऊन जंगलात जातो जंगलात त्याच्यासमोर वाघ येतो, वाघ त्याला खाणार एवढ्यात तो माणूस त्याच्या समोर छत्री उघडतो बघतो तर काय वाघ गोळी लागून मेलेला असतो.

ह्यावर तो गोष्ट ऐकणारा म्हातारा म्हणतो शक्य च नाही, ती गोळी कोणी दुसर्याने चालवली असेल.

डॉक्टर म्हणतो Exactly मी पण हेच सांगतोय.......

हळूच जोडेन बंध पुन्हा

बेभान सारे बंध तोडून
चौखूर होई उधळखोर
तरी सोडी खुणा मागे
मन माझे तुफानखोर

धावलो मी भटकलो मी,
आता थांबतो घटकाभर
शोधतो त्या जुन्या खुणा
अन मैत्रीचा ओलापाझर

आज नाचु देईल मनाला
गाफील करुन मित्रांखातर
हळूच जोडेन बंध पुन्हा
फेकुन देऊन हे वेषांतर

दशदिशांवर अंकुश असे जरी
मन भवसागरातील डोलकर
थकशील वा होशील कष्टी
सोबती असेल माझाच मैतर

या रे माझ्या मित्रांनो करा
या स्नेहनात्याचा जागर
क्षण आजचा प्रत्येक देईल
चिरकालिक आनंद अपार