Saturday, October 8, 2011

आळशी माणसं खुप हुशार असतात


" : आळशी माणसं खुप हुशार असतात :". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.


आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं. ;D


ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे. ;D


हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर. :D :D :D


ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला

मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D


पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही? :-[

मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे. :D ;D :D


पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही? :-[


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी


बाप ....

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,
एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,
जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक
बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,
दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,
बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन् शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,
अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन् सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,
बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,
चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,
जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,
आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

कधी एकट जगून तर बघ

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

बी हंग्री, बी फूलिश!


बी हंग्री, बी फूलिश!

स्टीव जॉब्स
मी तुम्हाला आज तीन गोष्टी सांगणार आहे. मोठं ...भाषणबिषण देणार नाहीये. पहिली गोष्ट आहे ठिपके जुळवण्याची. मी सहा महिन्यांतच कॉलेज सोडलं. माझा जन्म झाला, तेव्हा माझ्या आईचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने मला दत्तक द्यायचं ठरवलं होतं, जन्माच्या आधीच. तिची एकच अट होती, माझे दत्तक पालक कॉलेज ग्रॅज्युएट असले पाहिजेत. काही घोटाळ्यामुळे ज्यांनी अखेर मला दत्तक घेतले ते ग्रॅज्युएट नव्हते; पण त्यांनी वेळ येताच मला कॉलेजात प्रवेश घेऊन दिला खरा. पण सहा महिन्यांतच माझ्या लक्षात आलं की माझ्या पालकांचा कष्टाचा पैसा वाया जातोय. मी कॉलेज सोडलं. नंतरचं दीड वर्ष मी कॉलेजमध्येच ड्रॉपआउट म्हणून राहिलो. या दीड वर्षातच मी खूप काही शिकलो. मला खोली नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपायचो. दर रविवारी सात मैल चालत जाऊन हरे राम हरे कृष्ण मंदिरात फुकट जेवायचो. काही सेंट्ससाठी कोकच्या रिकाम्या बाटल्यासुद्धा विकायचो.


त्या वेळेस माझ्या कॉलेजमध्ये कॅलिग्राफीचे सर्वोत्तम शिक्षक होते. मी त्या वर्गात जाऊन बसायला लागलो. तिथे मी वेगवेगळे टाइपफेस आणि छपाईविषयी शिकलो. खरं तर त्या शिक्षणाचा मला प्रत्यक्ष उपयोग काहीच नव्हता; पण मी निव्वळ आनंदासाठी, मला आवडतं म्हणून ते शिकत गेलो. दहा वर्षांनंतर आम्ही जेव्हा पहिला मॅकिन्टॉश संगणक डिझाइन तयार करत होतो, तेव्हा ते सगळे मला आठवत गेले. आम्ही मॅकमध्ये ते वापरले. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. मी कॅलिग्राफी शिकत असताना हे मला माहीत नव्हते की, याचा मला उपयोग होणार आहे. ठिपके पुढचं पाहून जुळवता येत नाहीत, ते मागे वळूनपाहूनच जुळवावे लागतात. त्यामुळे ते कधी तरी जुळतील असा विश्वास ठेवूनच जगावं. मग तुम्ही त्याला काहीही म्हणा- कर्म, आयुष्य, नशीब, गट फीलिंग, काहीही. मला या भूमिकेमुळे कधीच तोटा झालेला नाही, तर माझं आयुष्यच बदलून गेलंय.

दुसरी गोष्ट आहे प्रेम किंवा आवडीबद्दलची.

मी नशीबवान आहे, मला काय आवडतं, हे मला आयुष्यात खूप लवकर उमगलं. मी आणि वॉझने माझ्या वडिलांच्या गॅरेजमधून ‘अॅयपल’ सुरू केली तेव्हा मी २० वर्षांचा होतो. दहा वर्षांनी ‘अॅरपल’ दोन अब्ज डॉलरची कंपनी झाली तेव्हा मी तिशीत होतो; पण मला ‘अॅझपल’ने हाकलून दिलं. आमच्या संचालक मंडळाचे आणि माझे मतभेद झाले. माझ्या जाणत्या वयाचा मोठा भाग ज्याने व्यापला होता, तोच गेला होता. मी उद्ध्वस्त झालो. हे माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही; पण माझी ‘अॅधपल’मधून झालेली हकालपट्टी ही माझ्याबाबतीत घडलेली सर्वोत्तम गोष्ट होती. यशामुळे जड झालेलं डोकं नवेपणाच्या आनंदाने हलकं झालं आणि माझ्या आयुष्यातल्या सर्वाधिक सृजनशील कालखंडाला सुरुवात झाली.


पुढच्या पाच वर्षांत मी दोन कंपन्या सुरू केल्या. मुलीच्या प्रेमात पडलो. त्यातली एक कंपनी ‘अॅचपल’नेच विकत घेतली आणि मी ‘अॅलपल’ कुटुंबात परत आलो. मला या काळात एवढंच लक्षात आलं की, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही शोधलंच पाहिजे. आवडतं ते काम आणि आवडतात ती माणसं, दोन्हीला हे लागू होतं.

चांगलं काम करायचं असेल तर ते तुमचं आवडतं काम असणं अत्यावश्यक आहे. त्यासाठी तडजोड करू नका, शोधत राहा. प्रेमात पडल्यावर कसं लगेच कळतं, तसं हेही तुमच्या लक्षात येईल. एखाद्या सुंदर नात्याप्रमाणे तुमचं कामही उत्तरोत्तर चांगलंच होत जाईल.



माझी तिसरी गोष्ट आहे मृत्यूबद्दलची. - मी सतरा वर्षांचा असताना एक वाक्य वाचलं होतं, प्रत्येक दिवस तुम्ही तुमचा शेवटचा दिवस असल्याप्रमाणे जगा... त्यानंतरचं माझं संपूर्ण आयुष्य मी या तत्त्वानुसार जगायचा प्रयत्न करतोय. रोज सकाळी मी आरशात पाहून मलाच विचारतो, आजचा दिवस तुझा अखेरचा असेल तर जे तू करणार आहेस, तेच तुला करावेसे वाटेल? जेव्हा या प्रश्नाचे उत्तर सलग काही दिवस नाही येते, तेव्हा माझ्या लक्षात येते की मला बदलण्याची गरज आहे.

वर्षभरापूर्वी मला कर्करोग झाल्याचं निदान झालं. मला डॉक्टरांनी केवळ तीन ते सहा महिने दिले. त्यांनी मला घरी जायला सांगितलं. म्हणाले, आवराआवर करायला लागा. म्हणजेच निरोप घ्यायला लागा, कुटुंबाला पुढे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करा.


नंतर असं निदान करण्यात आलं की, शस्त्रक्रिया करून मी बरा होईन आणि माझा कर्करोग कायमचा जाईल. या अनुभवातून गेल्यानंतर मी अधिकाराने म्हणू शकतो की कोणालाच मरायचं नसतं, अगदी ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनाही त्यासाठी मरायचं नसतं; पण तरीही ते कुणालाही चुकलेलं नाही. ते तसंच असलं पाहिजे कारण मृत्यू हा जीवनातील सर्वोत्तम शोध आहे. जुने मागे टाकून तोच नव्यासाठी जागा करतो. तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणूनच दुस-या कोणाचं आयुष्य जगून तो वाया घालवू नका. इतरांची मतं आपलीशी करू नका. तुमचं हृदय आणि मन काय सांगतायत तेच ऐकायचं धैर्य दाखवा. त्यांनाच माहीत असतं तुम्हाला खरं काय व्हायचंय. मी लहान असताना ‘दि होल अर्थ कॅटलॉग’ नावाचं मासिक निघायचं. कालांतराने ते बंद झालं. त्याच्या शेवटच्या अंकावर एका दूरवर जाणा-या रस्त्याचं छायाचित्र होतं आणि शब्द होते, ‘बी हंग्री, बी फूलिश...’ मी माझ्यासाठी कायम हाच विचार करत आलोय आणि तुम्हालाही त्याच शुभेच्छा देतो

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी