Wednesday, January 11, 2012

माघार

कळतंय मला तुझे वागणे
अस अचानक सारेच तोडणे
मान फिरवून जाताना हळूच
येणाऱ्या अश्रूला पुसून टाकणे

पण किती वेडा तू
समजलास नाही कधी
येते का माघारी
परतून वाहणारी नदी

तिचे नाते सागराशी
ते ना कधी संपायचे
त्याच्यातच अस्तित्व तिचे
त्यातच हरवून जायचे

तुला ना जमले कधी
विसरणे मीपण स्वताचे
येताच क्षण संघर्षाचे
ठाऊक माघारी फिरायचे

काही नाती असतात अशी
सोबतीस जशी श्वासांची दोरी
सरते नाते ना संपते परी
कधी आठवणींची शिदोरी

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

No comments:

Post a Comment