तू वर्गात येईपर्यंत आसुसलेले डोळे
अन् थबकलेले श्वास फक्त तुला पाहण्यासाठी
तुझं कधी मला चिडवणं,चेष्टा करणं,हसवणं
खूप आपलसं करून जातं
पण, कधी कधी एकदमच तुझं निःशब्द होणं
अनोळखी असल्यासारखं वागणं
पार जीवाला ठेच लावून जातं गं !
तू वर्गात येईपर्यंत,तुझ्या अनुपस्थितीत
आठवतात लगेच 'त्या' साऱ्या गोष्टी अन्
पुन्हा हळव्या करून जातात मनाला !
तू वर्गात येईपर्यंत दाराकडे दाराकडे टक लावून बघणारे डोळे !
अगदी,प्रत्येक पावलांचा आवाज टिपण्यासाठी दक्ष असलेले कान !
समोर चालू असलेल्या lecture शी माझं काहीही संबंध नाही,
असा मेंदू आणि तुझ्या entry साठी आतुरलेले मन !
आणि मधनच आठवतो तुझा निःशब्द सहवास
आणि घायाळ होतं काळीज!!!
खिडकीतून बाहेर बघणारे डोळे ! बाहेरच रखरखतं उन !
समोर बडबडणारे मास्तर आणि
बाहेरच्या पायऱ्यांवर बसलेली ती नेहमीची जोडी !
आणि आमचं असं कधी होणार य आशेवर
मी दरवाज्याकड बघत तुझी वाट बघायची !!!
अचानक,कडी वाजते टक टक
हृदयात येतो आशेचा किरण !पुन्हा टक टक !!
च्या मारी मास्तरला ऐकू नाही का येत ?
असं वाटतं मीच जाऊन दार उघडावं !
ए टकल्या दार उघड!
अन् एकदाच सर दार उघडतात .
दोन मिनिटं कोण आहे काहीच कळत नाही.
आणि असतो तो शिपाई ! टाय टाय फिश !!
आणि होतात डोक्याच्या चिंध्या चिंध्या....!!!
पुन्हा आळस देत त्या दाराकड बघायचं.
जरा खिडकीच्या बाहेर,जरा बेंचच्या खाली
जरा फळ्याकड आणि पुन्हा जरा जास्तच दाराकड !!!
आणि एकदम सरांनी माझ्याकडं बघायचं, उभं करायचं
आणि कुठलातरी अवघड प्रश्न विचारायचा.
च्या मारी त्या प्रश्नाचा अर्थ पण कळत नाही.
तरी पण आम्ही जरा विचार केल्यासारख करायचं
आणि म्हणायचं,सर जरा प्रश्न रिपीट करता प्लीज ?
मला काय उत्तराचा गंध पण नसतो.
मग, सरांनी पार इज्जतीचा फालुदा कारायचा.
अन् तेवढ्यात ,
पुन्हा दारावर टक टक आता दाराकड बघायचं माझं daring पण होत नाही !!
पण,सरांनी मात्र लगेच दार उघडायचं !!
तेवढ्यात आम्ही जरा उत्तराची जुळवाजुळव होते का बघायचं.
पण, सगळे आमचेच भाऊबंध ...
आता तिची entry आणि तिच्या हृदयातून आमची एक्षित
हे ठरलेलं समीकरण !!
तरीपण आजही कधी तू lectureला नसलीस की
आसुसतात ते डोळे अन् थबकतात ते श्वास
फक्त तुला पाहण्यासाठी !!!!
कवी - अनामिक
No comments:
Post a Comment