Monday, January 31, 2011

सुविचार .. भाग ४


१५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

१५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी, प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

१५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

१५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

१५७) हसा, खेळा पण शिस्त पाळा.

१५८) आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

१५९) स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

१६०) तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

१६१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

१६४) हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

१६५) उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

१६६) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

१६७) तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !

१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

१६९) दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

१७०) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

१७२) व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

१७४) दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू नका.

१७६) जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

१७७) दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

१७८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

१८०) परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

१८१) ऎकावे जनाचे करावे मनाचे.

१८२) एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

१८५) चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

१८६) तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

१८७) दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

१८८) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

१८९) स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

१९०) त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

१९१) जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

१९२) दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

१९३) पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

१९४) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

१९५) जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

१९६) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

१९८) मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

१९९) बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

२००) तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

No comments:

Post a Comment