कधीतरी जडावले पापण्यांचे भार
अवचित उगडले आठवांचे दार
दूर दूर गेले मन शोधीत उंबरा
कधी क्षितिजाशी कधी आकाशाच्या पार
झाल्या गेल्या चुका काही, काही देणे घेणे
हसताना बंध सारे झुगारून देणे
अनुमान कधी तिच्या होकाराचे घेता
नाजरेला नजरेचे घडायाचे वार
दिस मास गेले तसे झाले विपरीत
वादळात गेले सारे घरटे बुडीत
मागे उरल्या केवळ खुणा पुसलेल्या
काही नाती तुटलेली, वेदना अपार
No comments:
Post a Comment