काल पावसाबरोबर देवाने
बर्फाचे लहान खडे वाटले
जणू धरतीपर्यंत पोचण्या आधी
आभाळाचे रडे गोठले
मी पण उगीच उडास मी
पावसातही माझे दु:ख मांडले
खरंतर ढगांच्या ओंजळीतून
देवाचे अनमोल हिरे सांडले
माझ्यावर आपटत ते
बर्फाचे हिरे पडत होतो
मी हातात घेतलं की
विर्घळून गायब होत होते
देणारा देतोय आभाळातून
घेणाऱ्याला घेता येत नाही
नीट घेता न येणाऱ्याला
काही पण देता येत नाही
पावसात भिजता भिजता
माझं दु:ख विर्घळून गेलं
देवाच्या हिऱ्यांचं मला
महत्त्व कळून गेलं
हिरे पडतात सगळीकडे
ते मला बघता आले पाहिजेत
स्वत:ला घेता आले नाहीत तरी
दुसऱ्यांना देता आले पाहिजेत
No comments:
Post a Comment