२०१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.
२०२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
२०३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
२०४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
२०५) जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
२०६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.
२०७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
२०८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
२०९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.
२१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते.
२११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.
२१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं.
२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
२१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया, क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे.
२१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.
२१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.
२१८) जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
२१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
२२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.
२२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.
२२३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.
२२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही.
२२५) ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
२२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.
२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.
२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.
२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.
२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.
२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.
२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.
२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.
१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.
२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.
२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.
२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥
२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.
२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.
२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.
२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.
२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो
No comments:
Post a Comment