तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
रात्रीच्या आठवणी नंतर
सकाळच्या सोनेरी उन्हामध्ये
उमलते एखादे फुल.
टपोर्या डोळ्यावरील पुसत दव बिंदू
हास्य रंगाचे चेहर्यावर घेऊन
सुगंधाची करत बरसात
उमलते एखादे फुल.
नाजुक पाकळी ओठांची
किंचित विलग
आश्वासक शब्दांचा दिलासा देत
तुझ्या बद्दल सांगु काय मी
शब्दांना गुंतवु कसा मी
No comments:
Post a Comment