Tuesday, January 11, 2011

स्वतःसाठी पण जगशील !!!

ढगाळल्यासारखा राहू नको
आत्ता तरी बरसाना!
मनात तुझ्या दुःख नको ,
सखा समजून सांग ना!

अरे!फेकून दे साठवलेलं दुःख ,
विष म्हणून पितोस तू
पण, अश्रुंवाटे बाहेर येतच ना!

अरे! नको दाबू भावनांना ,
जरा अलग होऊदे ओठांना ,
बाहेर पडूदे शब्दांना,
मिळालीच जर,तर
मिळेल मोकळी वाट भावनांना !

गुदमरल्यासारखा जगतोस तु
मनातच कोंडतोस विचारांना
स्वतःलाही घुसमटत आहेस आणि स्वाभिमानही !

लक्षात ठेव, सिगारेटनं दुःख कमी होत असतं,
तर देवानं सिगारेट नावाची चीज
या जगात बनूच दिली नसती .
अरे तोच तर ही परीक्षा पाहतोय आपली.

अरे! फार नाई ,फार नाई
पण, व्हिस्कीच्या एका पेग सारख्या तरी
शेअर कर तुझ्या फिलिंग्ज माझ्याबरोबर.
मग तो प्याला तू दुःख पचवण्यासाठी नाही
तर आनंदासाठी पिशील .

मग बघ तू बरसशील अधाशासारखा बरसशील ,
मन मोकळा होऊन बरसशील
तुझं बरसणं बघायला त्या काळ्या ढगात
तो सहस्र रश्मीही बाहेर येईल !

तळपणारा तोही तुझ्या बरसण्यानं शांत होईल!
मग तो तुला सात रंगांचं आयुष्य बहाल करेल !!
मग तू याच जन्मात प्रत्येकवेळी नवं आयुष्य अनुभवशील!!!
वेगळं सुख अन् समाधानही !

पण, खरखुरं ! तू खरा सुखी असशील अन् समाधानीही
कधी तांबडा कधी पिवळा
कधी हिरवा तर कधी गुलाबी सुद्धा !!!

जगशील आनंदात जगशील स्वतःसाठी पण जगशील !!!

No comments:

Post a Comment